Monday, July 6, 2009

एक नंबर !!!!



वॉट अ मॅच........11.00 वाजले, मॅच संपली तरी मी काही TV सोडून उठायचे नाव घेत नव्हतो. रॉजर फेडेरेर् ह्या महान माणसाने आज 16 Grandslams खिताब जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला.फेडेरेर् ची मॅच असल्यामुळे मी सनडे नाइट ला सुद्धा TV पुढे बसलो होतो. अँडी रॉडिक आणि रॉजर फेडेरेर् दोघेही एकमेकांना पुरून उरतील असे खेळाडू. रॉडिक ची तुफान सर्विस तर डोके लावून नाजूकपणे कौशल्याने शॉट मारणारा फेडेरेर्.

पहिला सेट रॉडिक जिंकला वाटू लागले आता फेडेरेर् हारला. दुसर्या सेट फेडेरेर् ने अशी काही झुंज ड्यालला सुरवात केली की आता फेडेरेर् चे पारडे जड झाले. परत रॉडिक ने झुंज देण्यास सुरवात केली. मॅच आता tiebreaker मधे गेली होती. ना फेडेरेर् ना रॉडिक कोणीच हार मानायला तयार नाही.......अरे काय हे आमच्या सहन शक्तिचा अंत का पाहत आहात असे विचार मनात आला एकदा. पीट सँप्रस, रोड लेवेर, बियोर्न बोर्ग एवढे सारे महान खेळाडू सुद्धा हाताची नखे कुरतदत होते. सचिन ला तर जाम टेन्षन आले आहे असे स्पष्ट दिसत होते. एकावर एक एकमेकांना टोले देताच होते दोघेजण अखेर 16-14 असा पॉइण्ट घेतल्यावर फेडेरेर् जेव्हा जिंकला तेव्हा फेडेरेर् च्या चेहर्यावर झालेल्या आनंदापेक्षा रॉडिक च्या चेहर्यावरच्या निराशेने फार वाईट वाटले मला. काय झुंज दिली माणसाने!!!

खरच खेळ हा अत्यंत क्रूर असतो ह्यात शेवटी कोणाला कोणाला तरी विजयी व्हावेच लागते आणि दुसर्याने कितीही चांगली झुंज दिली असली तरी काळाच्या ओघात तो हरवला जातो आणि लक्षात राहतो तो फक्त चॅंपियन "जो जीता वही सिकंदर बाकी सारे बंदर" म्हणतात ना ते हेच.

ही मॅच बरेच काही शिकवून गेली हरून सुद्धा रडत रडत जोक मारणारा अँडी रॉडिक खिलाडू वृत्ती शिकवून गेला आणि कितीही अवघड काम समोर असले तरी असेल त्या सर्वानिशी झुंज द्यायची ह्याचे प्रात्यक्षिक देऊन गेला. सर्वात जास्त शिकवले ते फेडेरेर् ने. मागच्या वर्षी हाच फेडेरेर् इथे हारला होता नदाल कडून आणि वर्ल्ड रॅंक 2 पण झाला होता. ही मॅच जिंकून परत वर्ल्ड नं 1 पण झाला. विजय अमृितरज चे शब्द ऐकण्यासरकहे होते. "He dont want to be no 2 no he wouldnt accept it, He only wants to be no 1" काय ही जिद्द !!! अशी जिद्द सर्वानकडे असती तर आज आपण सगळे कुठे पोहचलो असतो?

No comments: