Monday, June 29, 2009

स्माइल स्टोन्स



मित्र...फ्रेंड ही अशी एक सपोर्ट सिस्टम आहे जी तुम्ही कधीही डिमांड करा तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आधार देते. आयुष्याच्या मार्गावरून चालताना मला अनेक व्यक्ती भेटल्या काही चांगल्या काही वाईट.....पण ह्यातल्या प्रत्येक टप्यावर मला काही व्यक्ती अशा भेटल्या की ज्यांनी मला घडवण्यात जाणता अजाणाता बराच मोठा हातभार लावला. हेच सर्व माझे फ्रेंड्स. म्हणतात ना की सांगतीचा असार तसे ह्यांच्यातील प्रत्येकाकडून मी काहिनाकाहितरि वेगळो शिकलो तेही फ्री ऑफ चार्ज. बालवाडीत असल्यापासून मी तसा अबोलच होतो......अगदी चौथीच्या मुसळे बाईंनी आईला बोलवून हे सांगितले.त्यामुळे जास्ती लोकांशी तेव्हा फारसा संबंध आलाच नाही. तरीही मुकुल हा एक माझा घट्ट मित्र बनला होता. मुकुल सारख्या माणसाकडून क्रिकेट आणि इतर बरेच खेळातील बारकावे शिकलो. ते रिक्षावले काका आले नसताना मी, अमेय, मुकुल आणि पूजा भर पावसात नलस्टॉप पासूनकोथरूडला घरी चालत गेल्याच आठवणी अजूनही येतात. आठवी नववीचा काळ असेल तेव्हा मला आईने कश्याप च्या घरी क्लास ला घातले इथूनच खरी माझी बोलायला सुरवात झाली. अनेक मित्रा मला इथे भेटले, मयूरआणि कौस्तुभ हे त्यातले गवसलेले हिर्यासारखे मित्रा. काय नाही शिकलो मी मयूर कडून? बाइक चालवायला, लोकांशी बोलायला, निसंकोचपणे लोकांची मदत करायला. अजूनही 12 वि मधे माझ्याकडे गाडी नसल्यामुळे एन एम च्या क्लाससाठी नियमीत घरी घ्यायला येणारा मयूर मी विसरू शकत नाही. कौस्तुभ ही अशीच दुसरी बिलन्दर व्यक्ती. मी कौस्तुभकडून काय घेतले हे कधीच सांगता येणार नाही. पण ह्या सर्व गोष्टी शिकल्यामुळेच माझ्यात कमालीचा बदल घडून आला हे नक्की.

अशाही काही व्यक्ती होत्या ज्यांचे मोल मला शाळेत समजलेच नाही पण जूनियर कॉलेज ला गेल्यावर त्यांच्याशी जास्त संबंध आल्यामुळे ते जाणवले पुढच्या व्यक्ती ह्या त्यातल्याच काही. मानसी कडून मी आर्टिस्टिक दृष्टिकोन काय असतो ( अजूनही मला तो नक्की काय वेगळा असतो ते नाही कळले), थोडिबहूत फोटोग्राफी म्हणजे जेवढी मला जमते तेवढी, सुंदर अक्षर( माझे तेवढे सुंदर कधीच होणार नाही) अशा अनेक गोष्टींचे पाठ घेतले. अजूनही मला आठवते ते पहिल्या शाळेच्या alumni meet च्या प्लॅनिंग च्या वेळेस मी दाबेलि चा कागद खाली टाकला म्हणून उचल तो कागद म्हणून ओरडणारी पर्यावरणप्रेमी शिल्पा, ह्यानंतर मी कधीच रस्त्यावर कचरा टाकला नाही हे तितकेच खरे. प्रियांका आणि प्राची ह्या दोन व्यक्तींकडून मी बिनधास्त कसे राहावे हे बघितले. कॉलेज ला सारंग आणि वळामे असे काही मृदूभाषी इसम भेटले. तसेच कोरू सारखी मामा मंत्री असूनही कधीच त्याची हवा ना केलेली अतिशय साधी व्यक्ती पण भेटली. सोहन सारखा एक नाटक आणि पोवड्याच्या दुनियेताला डार्क हॉर्स सापडला. सुमेध सारखा सकाळ वाचनचा आणि जनरल नालेज चा निस्सीम चाहता मला भेटला ज्याने मलाही सकाळ वाचनाचे अत्यंत वेड लावले. गंधार सारखा उत्तम कवी भेटला ज्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी लिखाण चालू केले.

ह्या सर्वांना मागे सोडून जेव्हा इंजिनियरिंग कॉलेज प्रवेश झाला तेव्हा फार रिकामे रिकामे वाटू लागले. सारे नवीन नवीन वातावरण आता नवे मित्र शोधायला लागणार ह्या भावनेने पोटात मोट्ता गोळा पण आला होता. पण काळ हेच सर्वांवर उत्तर आहे ( असम्भव नावाच्या बंडल सीरियल मधला एक डायलॉग) इथेही चांगल्या मित्रांनी पाठ नाही सोडली. विक्रम, भूषण, प्रशांत, महेश असे अनेक मित्र मिळाले. कायम हसत रहणारी नयना ही मैत्रीण मिळाली. अमृता आणि मिताली ह्या दोन व्यक्तींकडून खरी मैत्री काय असते हे मी शिकलो. मिताली कडून माझ्यात काय चुका आहेत हेही जाणून घेण्याचा मौका मला मिळाला. बिनधास्त पिंकुभाई भेटली.

कंपनी मधे सर्व प्रोफेशनल असतात कोणी मित्रा वगैरे नसते हे वाक्य किती खोटे आहे हे तिथे प्रवेश केल्यावरच कळले. कधीही फुड कोर्टला जायचे असल्यास हक्काचा दीपक, कितीही पान्चतट जोक्स असले तरी त्यावर दिलखुलास दाद देणारे नेहा आणि उमेशत्याचबरोबर कंपनी मधे सुरवातीला मला कामात काही त्रास होऊ नये म्हणून खूप मदत करणारी रोहिणी, फारसे कधीही ना बोलणारी पण दिसली की सतत हासणारी लक्ष्मी असे अनेक फ्रेंड्स मला गवसले.

असे अनेक मित्र ह्या वाटेवर मैलाचा दगडासारखे भेटले. कहींशी काळाच्या ओघात संपर्क तुटले तरीही त्यांच्या आठवणी कायम राहिल्या आहेत अजूनही. मैत्रीत झालेली भाण्डने, रूसवे फूगवे सारे काही आठवते पण त्याबरोबरच आठवते ते म्हणजे ह्या सर्वांनी आणलेले माझ्या चेहर्यावरील बहुमुल्य स्माइल आणि माझ्यात घडवलेला आमूलाग्र बदल. आता माझ्या आयुष्याचा नवा टप्पा चालू होत आहे, ह्या नव्या टप्प्यातही मला नवीन मित्र भेटतील आणि जीवनाच्या मार्गावर उलटा प्रवास करणे शक्या झाल्यास ह्या माझ्या हास्याच्या सपोर्ट सिस्टम ला परत एकदा भेट देण्याचा चान्स मिळेल हीच अपेक्षा................

No comments: