Thursday, June 25, 2009

अरे देवा.........!!!!!!!!!!!




दिनांक 25 june 2009 पराग भाकरे उर्फ नाना ह्याला कॉल वर व्हिसा काउन्सेलिंग देणे चालू होते.
त्याची बरीच मोठी चौकशी झाल्यावर मी "अरे पण तुझी इंटरव्यू डेट कधी आहे"
नाना "30 ला रे"
मी " आलीच की जवळ"
नाना " हो ना देवाचा धावा चालू केला आहे"
मी "अरे तो यूएस व्हिसा आहे तेव्हा जीसस चा जप कर"
फोन संपला थोड्याच वेळात पण ह्या मी मारलेल्या पान्चट विनोदाने माझ्या आस्तिक आणि नास्तिक ह्या विचारांना challenge दिले.आस्तिक म्हणजे नक्की असते तरी काय?? देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणजे आस्तिक असा अत्यंत सोपा शब्दकोशातला अर्थ ह्या शब्दाचा मिळतो. पण देवावर विश्वास म्हणजे नक्की काय.देवावर विश्वास ठेवणारया अनेक व्यक्ती मी आयुष्यात पहिल्या आहेत ज्या समोर एखादा भिकारी आला तर त्याच्या पोटासाठी दोन रुपयाची मदत पण देऊ करणार नाहीत आणि एखाद्या मंदिरातील मुर्तीच्या जिरणोधारासाठी हजारो रुपयांचे दान करतील.
अनेक ग्रंथ पुस्तके महाभारत रामायण सर्व वाचून झाले सर्व संत महात्म्यांनी एकाच शिकवण दिली आहे. की चराचरात देव आहे. मग तुम्ही समोर आलेल्या याचकातील देवाला नाराज नाही का करत? तुमचा विश्वास नक्की कशावर दगडाच्या निर्जीव मुर्तिवर की प्रत्येक सजीव व्यक्तीत देव आहे ह्याच्यावर? असे Hippocracy वले आयुष्या जगण्यापेक्षा मला नास्तिक म्हणून घ्यायला परवडेल. माझा विश्वास हा दगडातल्या देवावर नाही तर एका अद्न्यात शक्तीवर आहे. नास्तिक लोक देव ह्या आंगल चा साधारणतः विद्यानाच्या बाजूने विचार करतात. तसे म्हणाले तर हिंदू पुराणातून सांगितले गेलेल्या अनेक गोष्टींमधे साइंटिफिक रेफरेन्सस आढळून येतात. राम - रावण वॉर संपल्यावर कुबेराने रामास अयोध्येला त्याच्या पुष्पक विमानातून सोडले होते असे सांगतात. मग हे पुष्पक विमान म्हणजे कुबेरचे प्राइवेट जेट नाही का म्हणता येणार?एलीयेन्स पहिल्याचा पुरावा अनेक लोकांकडे आहे देव ही शक्ति कोणी कधी पहिली आहे का? हे अलीएनसच तर आपले देव नाहीत. ह्यांच्या टेक्नॉलजीस एवढ्या पुढे गेल्या आहेत म्हणजे आपण तरी असा विश्वास ठेवतो तर मग हीच ती अद्न्यात शक्ति असणे आपण नाकारू शकत नाही. तुकारामांचे वैकुंठा गमन म्हणजे alien abduction समजायचे का? ह्या प्रश्नाची उत्तरे ही आपल्या विचारांच्या आणि आकलन शक्तीच्या बाहेरची आहेत.
खरे सांगायचे झाले आहे तर अस्तिक काय आणि नास्तिक काय माणुसकीवर प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवते. माणसे वाईट वर विश्वास ठेवू शकतात मग चांगल्यावर का नाही? विश्वा हे duality theorem वर चालते असते असा विश्वास ठेवला तर सैतान आहे तसा देवहि आहेच. तो फक्त बघता आला पाहिजे.

3 comments:

Saurabh said...

bobyaa.. :)

आस्तिक अन नास्तिक.....देवाचे अस्तित्व आहे किवा नाही...आगदी typical topics बरका चर्चेसाथिचे....बॉबी तुजा मुद्दा बरोबर आहे की, "देवावर विश्वास ठेवणारया अनेक व्यक्ती मी आयुष्यात पहिल्या आहेत ज्या समोर एखादा भिकारी आला तर त्याच्या पोटासाठी दोन रुपयाची मदत पण देऊ करणार नाहीत आणि एखाद्या मंदिरातील मुर्तीच्या जिरणोधारासाठी हजारो रुपयांचे दान करतील." बरोबर..आस्तिकांच्या बाबतीत हे काहीसे विधान पटले....पण नास्तिक लोक देखिल असे किती आहेत जे सधल हाताने ह्या भिकर्यन्ना मदत करतात ?.. देवाच्या मूर्ति समोर न ज़ुक्नारे असे किती हे नास्तिक आहेत जे अश्या गलितगात्र लोकान्मधिल देवा समोर झुकतात..निश्चितच हे प्रमाण लक्षनिया नाहीये...असो!!!..:)
पण इथे अजुन बारकाईने विचार केल्यास मनुष्य वृत्ति,मनुष्य स्वभाव आपण ज्याला म्हणतो ,किवा त्या माणसाची जदन-घदन..'परवरिश' आपण ज्याला म्हणतो हे सुधा विचारत घ्यायला लागेल...बघ ना,काही माणस ही भावनिक असतात..काही कणखर असतात पण अगदी मोजक्याच प्रसंगान्ना त्यांच्या डोळ्यातून पानी येत...तर कही दगदाच आसतात..इथे प्रश्न असा आहे की तो मनुष्य जो त्या भिकार्या समोर आहे,आस्तिक आहे,तो मनुष्य स्वतः मनातून किती सात्विक आहे...किती भावनिक आहे..मनातून तो किती 'संवेदनशील' आहे ह्याचा विचार होणे आवश्यक आहे...कारण जर का त्या भिकर्याचा दुक्खाच जर का त्या अस्त्तिकापर्यन्त पोचत नसेल तर काय उपयोग.. ते दुक्ख पोचायला तो मनुष्य नक्कीच तेवढा भावनिक अन संवेदनशील हवाच...नाही का !!.. जर तसे होत नसेल त्या भिकर्याची संवेदनाच जर का त्याच्या पर्यन्त पोचत नसेल तर काय उपयोग... ..इथे भावानिकतेपेक्षा ' संवेदनशील ' हा शब्द मला आधिक योग्य वाटतो.. जेव्हा ही संवेदना; त्या भिकर्यासराख्या अनेक लोकांच्या वेदना-संवेदना ह्या[आस्तिक] लोकांपर्यंत पोहोचतील तेव्हा आपोआपच मदतीचा ओघ मुर्तिन्प्रमाने ह्या लोकांकडे सुद्धा वलेल हयात तिलमात्र शंका नाही.. ..

-सौरभ जहागीरदार

Gandhar Parakhi said...

माज़या मते... देव ही खरच खूप चांगली कॉन्सेप्ट आहे... आपल्या इंजिनियरिंग च्या किंवा साइन्स च्या वगैरे बुक्स मधे आपण एफीशियेन्सी किंवा इतर कुठलेही सिस्टम चा पर्फॉर्मेन्स मोजायला जे रेशियो घेतो टेनवा त्या प्रॅक्टिकल सिस्टम ला आइडीयल सिस्टम शी कंपेर करतो..मला वाटता की देव म्हणजे सुद्धा तसाच काहीतरी आहे...प्रत्येक माणॅसांी आपला कंपॅरिज़न देवशी करव ज्यामुळे त्याला कधीच वाटणार नाही की आपण खूप भारी आहोत वगैरे (तो उटणार नाही, मातणार नाही) आणि त्यामुळे तो शांत राहील..
पण हे सगळा लॉजिक सामान्य लोकांपर्यंत पोचवायच कसा? म्हणून या आइडिया च मार्केटिंग करण्यासाठी देवाचे सण आले, देव पूजा आली, देऊला आली..आणि ई थिंक तिथेच सगळा घोळ ज़ला... नुसता चॉक्लेट कोणी विकत घेणार नाही म्हणून त्याला चकचकीत रेपर मधे घालून विकला..तर लोकांनी चॉक्लेट दिला टाकून आणि रेपर चा रांग भगवा का हिरवा यावर वाद घालत बसले... यातून पुढे धर्म निर्माण ज़ले..आणि त्याची फळा आपण आज भोगातोच आहोत...असो..
राहिला प्रश्न अस्तिक- नास्तिक वादाचा... मला नाही वाटत की कोणीही 100% नास्तिक ऑर आस्तिक असतो... देवसाती उपास करायचा खरा पण तो जेनवा अगदीच असह्या होतो टेनवा देवाला डोळा मारुन आस्तिक मेजवण्या करतात... आणि मी सुद्धा स्वाट: ला कितीही नास्तिक नास्तिक म्हणत असलो तरी मी आयुष्यात कधी देवळात चपला घालून जौ शकणार नाही...

ता. क. : हे विचार पूर्णपणे वैयक्तिक असून त्यात कोणाच्याही भावना दुखावण्याची माज़ी आज्ज्जीबत इच्च् नाही!

गंधार पारखी

Unknown said...

Bapare bobbya..... Chan lihitos ki.. Mazyasathi jara Philosophy cha overdose zala. Atta CAT cha preparation karatana 1 shabda athawala "AGNOSTIC". Tula artha mahit aselach (Tumhi kay baba GRE wale..) "One who believes that there can be no proof of existence of God, but at the same time does not deny God's presence." Mazyamate jagatale maximum lok yach categoryt yetat...Chala.... tuzya blog mule 1 shabda lakshat rahil.. Agnostic.. Ek suggestion :- Tuzya blog cha font wadhaw or Font badal... Wachayala khup tras hotoy...