Thursday, June 25, 2009

लहानपण देगा देवा



"श्या ...........आपण मोठे का झालो राव" गंधार च्या ह्या मेल मधल्या वाक्याने 20 जून 2009 ला मनातल्या विचारांच्या समुद्रात एक दगड मारला.खरच का झालो आपण मोठे? असा एक गहन प्रश्न मला भेडसावायला लागला. ती लहानपणी केलेली वर्गात केलेली खडूंनी केलेली लढाई, शिक्षकांचा खाल्लेला मार आणि सगळ्यात जास्त म्हणजे मित्रांबरोबर केलेला दंगा सगळे काही कसे परत करावे अशी इच्छा होऊ लागली आणि ह्या मोठेपणाच्या नावाने आम्ही सर्वच चेन मेल सोबती खडे फोडू लागलो. लहानपण म्हणाले की पहिल्यांदा आठवतो तो तिसर्या मजल्यावरचा अभिनव मधला तो वर्ग. शाळेतला प्रत्येक एक सुख आणि दु:खाचा प्रत्येक क्षण डोळयासमोर तरळतो. इयत्ता चौथी मधले ते स्कॉलरशिप्स चे क्लासस आणि शाळा सुटल्यावर क्लास चालू होई पर्यंत खेळलेले पद आणि प्लास्टिक च्या बॉल चे क्रिकेट तर फारच लक्षात ठेवण्यासारखे होते.
तेव्हा पॅड आहे का बॅट ह्याचा विचार ना करता खेळलेया क्रिकेट मधला खरा आनंद आणि आता कंपनी मधे असताना अरे बॅट कशी वाकडी आहे कसे खेळणार असे अश्या व्य्तक केलेल्या भावनानमधली तफावत खूप मोठी आहे. शालेय जीवनमधे काढलेल्या ट्रिपा विशेषता: मुंबई ची ट्रिप आणि त्या ट्रिप मधे सर्वात मिळू मिसळून राहणे आणि आता ट्रिप ला गेल्यावर ग्रूप ग्रूप ने फिरणे....... खरच एवढा बदल कसा काय झाला आपल्यात. मोठे होता होता जबाबदारयांचे, अनेकांच्या अपेक्षान्चे ओझे उचलता उचलता माझ्यातले एक लहान मूल कुठे लपून बसले आहे ह्याचा शोध घेण्याची अत्यंत निकड भासु लागली आहे. आता सर्व मित्र मंडळी मोठे झाली आहेत काही दिवसात सर्वांची लग्न होतील मग काही दिवसांनी एक ह्या देशात दुसरा त्या देशात अशी परिस्थिती होईल महणजे आत्ताची परिस्थिती फारशी वेगळी आहे असे नाही. मग तेच इकडचे तिकडचे ऑनलाइन चॅट हाय कसा आहेस कुठे असतोस एवढे ठरलेले प्रश्न असे चालतच राहील पण एकत्र भेटून केलेली मजा काही परत परत चाखता येणार नाही.मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी दडवलेल्या आठवणी सारख्या चलतचित्रांसारख्या बघुनच समाधान मानावे लागणार आहे. ह्या सर्व चेन मेल मधल्या चर्चेला आणि विचारांना कौस च्या मेल ने वेगळेच वळण मिळाले. गद्रेराजे ह्यांना ह्यैद्राबाद मधल्या रिक्षातून जाताना लहानपणी खेळलेल्या मधले बोट ओळखा ह्या खेळाच्या आठवणीने एवढ्या गर्दीतून रिक्षावला ओळखा असा आधुनिक खेळ सापडला तेव्हा खात्री झाली की आपल्यातले लहानपण अजुन शाबूत आहे. ते कुठेही गेलेले नाही फक्त ते आता बाहेर यायला जरा बुजत आहे. आपण मोठे झालो म्हणजे खोड्या काढू शकत नाही असे कोण म्हणते रिक्षावला ओळखा सारखे खेळ खेळू शकत नाही असे कोण म्हणते. मोठे होण्यात हीच तर खरी गंमत आहे मनात आणले तर तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही करू शकता. लहानपंच्या काही गोष्टींच्या उणीवा भासतात मोठेपणी पण मोठे झाल्याचे अनेक फायदे पण दिसून येतात. मित्रा भेटणार नाहीत दूर दूर जातील असा विचार करायच्या ऐवजी आपल्याला दुसर्या शहरात ओळखीचे हक्काचे घर आहे.असे मानले तर गोष्टी किती सोप्या होतात.
आयुष्य हे असेच आहे आपल्याकडे जे नाही आहे त्याचीच आपल्याला कायम आस असते हे खरे लहानपणी आपल्याला मोठेपण हवे होते आणि आता मोठेपणी लहानपण हेच खरे.

2 comments:

Manasi Inamdar urf Mai said...

बॉबी तू अतिशय भारी काम केले आहेस...... तू लिहिलेला ब्लॉग वाचताना माझ्या डोळ्यातून पाणी आल यार.......
असे मित्रा मैत्रिणी असतील तर मला माझा लहानपण कायम जपता येईल.......... मानसी इनामदार

Anonymous said...

ha vishay asa ahe bobby ki jeve keve lahapaniche divas athavatat teva teva purna sharirat ek shahari yeyun jate.kharach evadhe mothe zalot ka apan?ka ugachach apalyavar alelya jababdarya challenge manun na swikarata ojhe manun pativar gheun firalyamule apalyala yachi trivarta jast janavatye.tujha manan khara ahe apalya aat ek lahan man ajunahi lapalay fakt tyala bhojya kiva estop karun out ( baher kadhane ya arthi) karanyachi garaj ahe.

mitranmadhe asatana dhamal karatana dilkhulas pane lahan vhave ani ekadha motha nirnay ghyayachi vel ali tar tevadhech gambhir, vicharpurvak ani anubhavi paul takave.
ha talmel sadhata ala tar mala vatat "shya apan mothe ka zalo yaar " yache dukha na vatata lahanpan japalyache samadhan jast vatel.