Monday, June 29, 2009

स्माइल स्टोन्स



मित्र...फ्रेंड ही अशी एक सपोर्ट सिस्टम आहे जी तुम्ही कधीही डिमांड करा तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आधार देते. आयुष्याच्या मार्गावरून चालताना मला अनेक व्यक्ती भेटल्या काही चांगल्या काही वाईट.....पण ह्यातल्या प्रत्येक टप्यावर मला काही व्यक्ती अशा भेटल्या की ज्यांनी मला घडवण्यात जाणता अजाणाता बराच मोठा हातभार लावला. हेच सर्व माझे फ्रेंड्स. म्हणतात ना की सांगतीचा असार तसे ह्यांच्यातील प्रत्येकाकडून मी काहिनाकाहितरि वेगळो शिकलो तेही फ्री ऑफ चार्ज. बालवाडीत असल्यापासून मी तसा अबोलच होतो......अगदी चौथीच्या मुसळे बाईंनी आईला बोलवून हे सांगितले.त्यामुळे जास्ती लोकांशी तेव्हा फारसा संबंध आलाच नाही. तरीही मुकुल हा एक माझा घट्ट मित्र बनला होता. मुकुल सारख्या माणसाकडून क्रिकेट आणि इतर बरेच खेळातील बारकावे शिकलो. ते रिक्षावले काका आले नसताना मी, अमेय, मुकुल आणि पूजा भर पावसात नलस्टॉप पासूनकोथरूडला घरी चालत गेल्याच आठवणी अजूनही येतात. आठवी नववीचा काळ असेल तेव्हा मला आईने कश्याप च्या घरी क्लास ला घातले इथूनच खरी माझी बोलायला सुरवात झाली. अनेक मित्रा मला इथे भेटले, मयूरआणि कौस्तुभ हे त्यातले गवसलेले हिर्यासारखे मित्रा. काय नाही शिकलो मी मयूर कडून? बाइक चालवायला, लोकांशी बोलायला, निसंकोचपणे लोकांची मदत करायला. अजूनही 12 वि मधे माझ्याकडे गाडी नसल्यामुळे एन एम च्या क्लाससाठी नियमीत घरी घ्यायला येणारा मयूर मी विसरू शकत नाही. कौस्तुभ ही अशीच दुसरी बिलन्दर व्यक्ती. मी कौस्तुभकडून काय घेतले हे कधीच सांगता येणार नाही. पण ह्या सर्व गोष्टी शिकल्यामुळेच माझ्यात कमालीचा बदल घडून आला हे नक्की.

अशाही काही व्यक्ती होत्या ज्यांचे मोल मला शाळेत समजलेच नाही पण जूनियर कॉलेज ला गेल्यावर त्यांच्याशी जास्त संबंध आल्यामुळे ते जाणवले पुढच्या व्यक्ती ह्या त्यातल्याच काही. मानसी कडून मी आर्टिस्टिक दृष्टिकोन काय असतो ( अजूनही मला तो नक्की काय वेगळा असतो ते नाही कळले), थोडिबहूत फोटोग्राफी म्हणजे जेवढी मला जमते तेवढी, सुंदर अक्षर( माझे तेवढे सुंदर कधीच होणार नाही) अशा अनेक गोष्टींचे पाठ घेतले. अजूनही मला आठवते ते पहिल्या शाळेच्या alumni meet च्या प्लॅनिंग च्या वेळेस मी दाबेलि चा कागद खाली टाकला म्हणून उचल तो कागद म्हणून ओरडणारी पर्यावरणप्रेमी शिल्पा, ह्यानंतर मी कधीच रस्त्यावर कचरा टाकला नाही हे तितकेच खरे. प्रियांका आणि प्राची ह्या दोन व्यक्तींकडून मी बिनधास्त कसे राहावे हे बघितले. कॉलेज ला सारंग आणि वळामे असे काही मृदूभाषी इसम भेटले. तसेच कोरू सारखी मामा मंत्री असूनही कधीच त्याची हवा ना केलेली अतिशय साधी व्यक्ती पण भेटली. सोहन सारखा एक नाटक आणि पोवड्याच्या दुनियेताला डार्क हॉर्स सापडला. सुमेध सारखा सकाळ वाचनचा आणि जनरल नालेज चा निस्सीम चाहता मला भेटला ज्याने मलाही सकाळ वाचनाचे अत्यंत वेड लावले. गंधार सारखा उत्तम कवी भेटला ज्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी लिखाण चालू केले.

ह्या सर्वांना मागे सोडून जेव्हा इंजिनियरिंग कॉलेज प्रवेश झाला तेव्हा फार रिकामे रिकामे वाटू लागले. सारे नवीन नवीन वातावरण आता नवे मित्र शोधायला लागणार ह्या भावनेने पोटात मोट्ता गोळा पण आला होता. पण काळ हेच सर्वांवर उत्तर आहे ( असम्भव नावाच्या बंडल सीरियल मधला एक डायलॉग) इथेही चांगल्या मित्रांनी पाठ नाही सोडली. विक्रम, भूषण, प्रशांत, महेश असे अनेक मित्र मिळाले. कायम हसत रहणारी नयना ही मैत्रीण मिळाली. अमृता आणि मिताली ह्या दोन व्यक्तींकडून खरी मैत्री काय असते हे मी शिकलो. मिताली कडून माझ्यात काय चुका आहेत हेही जाणून घेण्याचा मौका मला मिळाला. बिनधास्त पिंकुभाई भेटली.

कंपनी मधे सर्व प्रोफेशनल असतात कोणी मित्रा वगैरे नसते हे वाक्य किती खोटे आहे हे तिथे प्रवेश केल्यावरच कळले. कधीही फुड कोर्टला जायचे असल्यास हक्काचा दीपक, कितीही पान्चतट जोक्स असले तरी त्यावर दिलखुलास दाद देणारे नेहा आणि उमेशत्याचबरोबर कंपनी मधे सुरवातीला मला कामात काही त्रास होऊ नये म्हणून खूप मदत करणारी रोहिणी, फारसे कधीही ना बोलणारी पण दिसली की सतत हासणारी लक्ष्मी असे अनेक फ्रेंड्स मला गवसले.

असे अनेक मित्र ह्या वाटेवर मैलाचा दगडासारखे भेटले. कहींशी काळाच्या ओघात संपर्क तुटले तरीही त्यांच्या आठवणी कायम राहिल्या आहेत अजूनही. मैत्रीत झालेली भाण्डने, रूसवे फूगवे सारे काही आठवते पण त्याबरोबरच आठवते ते म्हणजे ह्या सर्वांनी आणलेले माझ्या चेहर्यावरील बहुमुल्य स्माइल आणि माझ्यात घडवलेला आमूलाग्र बदल. आता माझ्या आयुष्याचा नवा टप्पा चालू होत आहे, ह्या नव्या टप्प्यातही मला नवीन मित्र भेटतील आणि जीवनाच्या मार्गावर उलटा प्रवास करणे शक्या झाल्यास ह्या माझ्या हास्याच्या सपोर्ट सिस्टम ला परत एकदा भेट देण्याचा चान्स मिळेल हीच अपेक्षा................

Sunday, June 28, 2009

सांग सांग भोलानाथ............




आजची सकाळ. मंडे मॉर्निंग. आधीच एक तर दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आळशी असलेली सकाळ. अशातच मी घरून company बस पकडायला धावत पळत निघालो.वर आभाळ भरून आले असले तरीही मी जवळ छत्त्री विन्चेआटेर् काहीच घेतले नाही. मला खात्रीच झाली आहे की पावसाने पण धडे घेतले आहेत भारतीय राज्यकर्त्यांकडून नुसती आशा दाखवतो पुढे काहीच नाही.
असेच पावसाला दूषणे देत देत माझी पावले माझ्या स्टॉप च्या दिशेने पडत होती. तेवढ्यात समोर जे काही आले ते पाहून खरेच त्या अद्न्यात शक्तीने माझ्या मनातले ऐकले का काय असे मला वाटू लागले. माझ्या समोरच साक्षात नंदी बैल उभा येऊन ठाकला होता. एक माणूस त्या नंदबैलाला सजवून गाडी ओढत ओढत माझ्याच दिशेने येताना दिसला. आता खरे तर अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही पण कसे आहे की डॉक्टरांकडून सर्व उपाय करून झाले आणि तरीही काही होत नाही असे जाणवू लागले की गरजू व्यक्ती जसे एखाद्या बुवाकडे जातात तसे माझे झाले आहे. पुणे वेधशाळेवर आणि हवामान खात्यावरचा विश्वास तर लहानपणीच उडाला होता. हे नक्की माहीत होते त्यांनी अंदाज वर्तवला येणार येणार की हमखास नाही येत पाउस आणि ते नाही येणार म्हणाले की हमखास येतोच. दोघांमधे भलतीच खुन्नस आहे. पण यावेळेस पावासाने त्यांच्या दोन्ही अंदाजांना दाद लागू दिली नाही. जणू काही तो रुसूनच बसला आहे. दर वर्षी गणपती ला पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात तसे आता पावसच सण साजरा करून त्याला लवकर या पुढच्या वर्षी असे म्हणायची गरज आहे.
असो त्यामुळे हे सर्व लक्षात घेता मनाशी महणले जाउ दे कसला विश्वास आणि कसले काय विचारून तर बघू. हिंमत करून गेलो पुढे नन्दिचा शंकर(मालक) म्हणजे शंकर्याने माझ्याकडे लगेच 10 रु ची डिमांड केली. हं.....चला आजचा दिवस दान धर्म करायचा दिसत आहे तर. मी आपला रिसेशन च्या काळात 10 रुपयाची नॉट त्याच्यापुढे केली."विचारू का" मला पुढे काय करायचे काहीच कल्पना नसल्याने मी त्या शंकर्‍याला विचारले. तो "विचारा की" म्हणाला.
मी आपला माणसाला करतात तसा डाइरेक्ट एकाच प्रश्न त्याला केला " पाउस पडणार का"
इथून पुढचा जो काही 10-15 सेकेंड्स चा सस्पेन्स होता तो म्हणजे राम गोपाल वर्माच्या मूवीस पेक्षा नक्कीच खिळवून ठेवणारा होता.
त्या "नंदबैईलाने बुगु बुगु करत मान हलवली. चला मनाला समाधान लाभले. Atleast नंदबैल तरी हो म्हणाला.
मला बस ला उशीर व्हायला लागल्यामुळे मी तडक निघालो खरा पण आता पावसाळा शिव्हया घालत जाण्यापेक्षा पावसातील अनेक गमती आठवत माझा पुढचा प्रवास होऊ लागला. अजूनही मला आशा आहे की होईल त्याची कृपा. येतील ते मेघ दाटून. नद्या आणि पुण्यातले रस्ते मस्त दुथडि भरून वाहतील... बाहेर मस्त पाउस पडेल आणि मी एक कॉफीचा वाफाळलेला कप, भज्यांची प्लेट आणि मित्र ह्यांच्या संगतीत तो एन्जॉय करेन. काही का होईना विश्वास असो वा नसो हा नन्दिबैल माझ्या मनाला एक प्रकारची नवी आशा देऊन गेला....

Thursday, June 25, 2009

अरे देवा.........!!!!!!!!!!!




दिनांक 25 june 2009 पराग भाकरे उर्फ नाना ह्याला कॉल वर व्हिसा काउन्सेलिंग देणे चालू होते.
त्याची बरीच मोठी चौकशी झाल्यावर मी "अरे पण तुझी इंटरव्यू डेट कधी आहे"
नाना "30 ला रे"
मी " आलीच की जवळ"
नाना " हो ना देवाचा धावा चालू केला आहे"
मी "अरे तो यूएस व्हिसा आहे तेव्हा जीसस चा जप कर"
फोन संपला थोड्याच वेळात पण ह्या मी मारलेल्या पान्चट विनोदाने माझ्या आस्तिक आणि नास्तिक ह्या विचारांना challenge दिले.आस्तिक म्हणजे नक्की असते तरी काय?? देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणजे आस्तिक असा अत्यंत सोपा शब्दकोशातला अर्थ ह्या शब्दाचा मिळतो. पण देवावर विश्वास म्हणजे नक्की काय.देवावर विश्वास ठेवणारया अनेक व्यक्ती मी आयुष्यात पहिल्या आहेत ज्या समोर एखादा भिकारी आला तर त्याच्या पोटासाठी दोन रुपयाची मदत पण देऊ करणार नाहीत आणि एखाद्या मंदिरातील मुर्तीच्या जिरणोधारासाठी हजारो रुपयांचे दान करतील.
अनेक ग्रंथ पुस्तके महाभारत रामायण सर्व वाचून झाले सर्व संत महात्म्यांनी एकाच शिकवण दिली आहे. की चराचरात देव आहे. मग तुम्ही समोर आलेल्या याचकातील देवाला नाराज नाही का करत? तुमचा विश्वास नक्की कशावर दगडाच्या निर्जीव मुर्तिवर की प्रत्येक सजीव व्यक्तीत देव आहे ह्याच्यावर? असे Hippocracy वले आयुष्या जगण्यापेक्षा मला नास्तिक म्हणून घ्यायला परवडेल. माझा विश्वास हा दगडातल्या देवावर नाही तर एका अद्न्यात शक्तीवर आहे. नास्तिक लोक देव ह्या आंगल चा साधारणतः विद्यानाच्या बाजूने विचार करतात. तसे म्हणाले तर हिंदू पुराणातून सांगितले गेलेल्या अनेक गोष्टींमधे साइंटिफिक रेफरेन्सस आढळून येतात. राम - रावण वॉर संपल्यावर कुबेराने रामास अयोध्येला त्याच्या पुष्पक विमानातून सोडले होते असे सांगतात. मग हे पुष्पक विमान म्हणजे कुबेरचे प्राइवेट जेट नाही का म्हणता येणार?एलीयेन्स पहिल्याचा पुरावा अनेक लोकांकडे आहे देव ही शक्ति कोणी कधी पहिली आहे का? हे अलीएनसच तर आपले देव नाहीत. ह्यांच्या टेक्नॉलजीस एवढ्या पुढे गेल्या आहेत म्हणजे आपण तरी असा विश्वास ठेवतो तर मग हीच ती अद्न्यात शक्ति असणे आपण नाकारू शकत नाही. तुकारामांचे वैकुंठा गमन म्हणजे alien abduction समजायचे का? ह्या प्रश्नाची उत्तरे ही आपल्या विचारांच्या आणि आकलन शक्तीच्या बाहेरची आहेत.
खरे सांगायचे झाले आहे तर अस्तिक काय आणि नास्तिक काय माणुसकीवर प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवते. माणसे वाईट वर विश्वास ठेवू शकतात मग चांगल्यावर का नाही? विश्वा हे duality theorem वर चालते असते असा विश्वास ठेवला तर सैतान आहे तसा देवहि आहेच. तो फक्त बघता आला पाहिजे.

लहानपण देगा देवा



"श्या ...........आपण मोठे का झालो राव" गंधार च्या ह्या मेल मधल्या वाक्याने 20 जून 2009 ला मनातल्या विचारांच्या समुद्रात एक दगड मारला.खरच का झालो आपण मोठे? असा एक गहन प्रश्न मला भेडसावायला लागला. ती लहानपणी केलेली वर्गात केलेली खडूंनी केलेली लढाई, शिक्षकांचा खाल्लेला मार आणि सगळ्यात जास्त म्हणजे मित्रांबरोबर केलेला दंगा सगळे काही कसे परत करावे अशी इच्छा होऊ लागली आणि ह्या मोठेपणाच्या नावाने आम्ही सर्वच चेन मेल सोबती खडे फोडू लागलो. लहानपण म्हणाले की पहिल्यांदा आठवतो तो तिसर्या मजल्यावरचा अभिनव मधला तो वर्ग. शाळेतला प्रत्येक एक सुख आणि दु:खाचा प्रत्येक क्षण डोळयासमोर तरळतो. इयत्ता चौथी मधले ते स्कॉलरशिप्स चे क्लासस आणि शाळा सुटल्यावर क्लास चालू होई पर्यंत खेळलेले पद आणि प्लास्टिक च्या बॉल चे क्रिकेट तर फारच लक्षात ठेवण्यासारखे होते.
तेव्हा पॅड आहे का बॅट ह्याचा विचार ना करता खेळलेया क्रिकेट मधला खरा आनंद आणि आता कंपनी मधे असताना अरे बॅट कशी वाकडी आहे कसे खेळणार असे अश्या व्य्तक केलेल्या भावनानमधली तफावत खूप मोठी आहे. शालेय जीवनमधे काढलेल्या ट्रिपा विशेषता: मुंबई ची ट्रिप आणि त्या ट्रिप मधे सर्वात मिळू मिसळून राहणे आणि आता ट्रिप ला गेल्यावर ग्रूप ग्रूप ने फिरणे....... खरच एवढा बदल कसा काय झाला आपल्यात. मोठे होता होता जबाबदारयांचे, अनेकांच्या अपेक्षान्चे ओझे उचलता उचलता माझ्यातले एक लहान मूल कुठे लपून बसले आहे ह्याचा शोध घेण्याची अत्यंत निकड भासु लागली आहे. आता सर्व मित्र मंडळी मोठे झाली आहेत काही दिवसात सर्वांची लग्न होतील मग काही दिवसांनी एक ह्या देशात दुसरा त्या देशात अशी परिस्थिती होईल महणजे आत्ताची परिस्थिती फारशी वेगळी आहे असे नाही. मग तेच इकडचे तिकडचे ऑनलाइन चॅट हाय कसा आहेस कुठे असतोस एवढे ठरलेले प्रश्न असे चालतच राहील पण एकत्र भेटून केलेली मजा काही परत परत चाखता येणार नाही.मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी दडवलेल्या आठवणी सारख्या चलतचित्रांसारख्या बघुनच समाधान मानावे लागणार आहे. ह्या सर्व चेन मेल मधल्या चर्चेला आणि विचारांना कौस च्या मेल ने वेगळेच वळण मिळाले. गद्रेराजे ह्यांना ह्यैद्राबाद मधल्या रिक्षातून जाताना लहानपणी खेळलेल्या मधले बोट ओळखा ह्या खेळाच्या आठवणीने एवढ्या गर्दीतून रिक्षावला ओळखा असा आधुनिक खेळ सापडला तेव्हा खात्री झाली की आपल्यातले लहानपण अजुन शाबूत आहे. ते कुठेही गेलेले नाही फक्त ते आता बाहेर यायला जरा बुजत आहे. आपण मोठे झालो म्हणजे खोड्या काढू शकत नाही असे कोण म्हणते रिक्षावला ओळखा सारखे खेळ खेळू शकत नाही असे कोण म्हणते. मोठे होण्यात हीच तर खरी गंमत आहे मनात आणले तर तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही करू शकता. लहानपंच्या काही गोष्टींच्या उणीवा भासतात मोठेपणी पण मोठे झाल्याचे अनेक फायदे पण दिसून येतात. मित्रा भेटणार नाहीत दूर दूर जातील असा विचार करायच्या ऐवजी आपल्याला दुसर्या शहरात ओळखीचे हक्काचे घर आहे.असे मानले तर गोष्टी किती सोप्या होतात.
आयुष्य हे असेच आहे आपल्याकडे जे नाही आहे त्याचीच आपल्याला कायम आस असते हे खरे लहानपणी आपल्याला मोठेपण हवे होते आणि आता मोठेपणी लहानपण हेच खरे.